अकोला शहराच्या गजबजाटात आज सकाळी एक सुंदर आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळालं. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या शासकीय निवासस्थानी एका मोराने आपल्या पिसाऱ्याचा विस्तार करत केलेल्या नृत्याने सर्वांचेच डोळे दिपून गेले. या निसर्गरम्य क्षणाने उपस्थितांना आनंदाचा अनोखा अनुभव दिला आहे.