जगप्रसिद्ध पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला शहरातील विणकरांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कलाकौशल्याची छाप उमटवली आहे. येथील प्रसिद्ध पैठणी विणकर अमोल घायवट आणि नैना घायवट या दाम्पत्याने पैठणीच्या शेल्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची आकर्षक प्रतिमा विणकामातून साकारली आहे. विशेष म्हणजे ही अनोखी पैठणी लवकरच मनोज जरांगे यांना भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती अमोल घायवट यांनी दिली.