पुण्याच्या मुळशीतील बापूजीबुवा घाटात मोकाट बैलाचा थरार पाहायला मिळाला. माण-घोटवडे रस्त्यावरील बापूजीबुवा घाटात एका मोकाट बैलाने अचानक चारचाकी गाडीला अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चारचाकी गाडी अडवत बैलाने शिंगानी गाडीला धडका मारल्या. या घटनेवेळी समोरच्या बाजूला उभ्या असणाऱ्या ट्रक्टर चालकाने, प्रसंगावधान दाखवत बैलाला हुसकावून लावले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झालाय.