आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकऱ्याची डाळिंब पिकाची यशस्वी शेती अडीच एकरातून मिळवले 60 लाखांचे उत्पन्न घेतले. जिथे साधे गवतही उगवत नव्हते, अशा दगडधोंड्यांच्या माळरानावर आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी कष्टाने नंदनवन फुलवले आहे. अवघ्या अडीच एकर शेतीत त्यांनी सेंद्रिय पद्धतीने 'भगवा' जातीच्या डाळिंबाची बाग बहरली असून, यंदा त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.