गेल्या २० वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखेर आज आला. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. यानिमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकमेकांना हात मिळवत मिठी मारली. तसेच त्यांनी एकत्र येत वज्रमूठ दाखवत फोटोशूटही केले.