आदित्य ठाकरेंनी नाशिकमधील प्रस्तावित वृक्षतोडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. नाशिकला दत्तक घेण्याचा दावा करणारेच आता झाडे का कापत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय गांधी नॅशनल पार्क, तपोवन, अजनी वन यांसारखी वने सपाट करून वाळवंटात कारभार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे का, असेही त्यांनी विचारले.