अमरावतीत ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीने (ड क ब अ) लावल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. यामुळे विरोधकांना हरवण्यासाठी हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लोकशाहीचा खून होत असल्याचे अडसूळ यांनी म्हटले. जिल्हाधिकारी व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.