नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी विजयी झाल्यानंतर नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने देवडिया भवन येथील काँग्रेस कार्यालयात जल्लोष करण्यात आला.