अबू आझमी यांनी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईमध्ये भाषेच्या नावावर गरीब लोकांना मारहाण आणि अपमानित केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. रिक्षाचालक, भाजी विक्रेते आणि मजूर यांना लक्ष्य केले जात असताना, अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रश्न विचारला जात नाही, अशी टीका त्यांनी केली. याचवेळी, त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली.