अबू सालेमने भावाच्या निधनानंतर १४ दिवसांचा पॅरोल मागितला आहे. मात्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात त्याला विरोध केला आहे. सालेमला पॅरोल दिल्यास तो फरार होण्याची शक्यता असून, भारत आणि पोर्तुगाल संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे. यावर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.