अहिल्यानगर – पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी एक पिकअप गाडी चालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्यालगत असलेल्या पत्रा शेडमध्ये घुसली. ही घटना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावाजवळ, हॉटेल विठ्ठल कामत समोर घडली आहे. या अपघातात गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.