नसरापुर प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शासन म्हणून आम्ही निर्णय घेऊ. बालिकेची अत्यंत निर्घुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सर्वात जलदगतीने लागलेल्या निकालाची ही पहिलीच घटला ठरली आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते. यामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल. आणि यापुढे अशी कृती करण्यासाठी लोक धजावणार नाहीत अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.