कफ सिरपमुळे 20 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने तपास मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तपासणीदरम्यान Coldrilif सिरपचा साठा आढळला नाही, मात्र Respiresh TR (Batch No. R01GL2523) या सिरपच्या 38 बाटल्या सापडल्या. तपासात या सिरपमध्ये मानवी शरीरासाठी हानिकारक DEG या घटकाचे प्रमाण नियमानुसार 1 टक्क्यांपेक्षा 0.7 टक्क्यांनी अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संपूर्ण साठा जप्त करून विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये व मेडिकल स्टोअर्समधून नमुने घेतले गेले आहेत. तसेच डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरप विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्या तीन मेडिकल दुकांनवर कारवाई करण्यात आली आहे.