इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव गावात पनीर उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर शहापूर पोलीस आणि कोल्हापूर अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. जमजम ट्रेडर्स, अक्कलकोट यांच्या मालकीच्या या पनीर उत्पादन केंद्रामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीर तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.