मराठी चित्रपट अभिनेता सुनिल बर्वे याने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर इंस्टाग्रामवर भाष्य केले आहे. सुनिल याने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे की,कुठल्याही व्यक्तीचा जीव कुठल्याही विचारांपेक्षा जास्त मोलाचा आहे! आपल्या आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ लपलेले नाहीत ना,हकनाक यात आपण बळी पडत नाही आहोत ना,विचारांचा विरोध विचारांनी व्हावा, चर्चा व्हावी, जीव जाऊ नयेत, हेच अंतीम उद्दिष्टं असावं! ‘सर्वे भवन्तू सुखीनः सर्वे संतू निरामयः’ असे वक्तव्य सुनिल बर्वे यांनी व्यक्त करीत शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतो असे म्हटले आहे.