मुंबईतील वरळी डोममध्ये 5 ऑगस्टला 60-61 व्या महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अभिनेत्री काजोल देवगण यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं. काजोलने यावेळेस मराठीतून मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मनं जिंकली. त्यानंतर काजोलकडे माध्यम प्रतिनिधींकडून हिंदीत प्रतिक्रियेची मागणी करण्यात आली. यावर "मी आता हिंदीत बोलू? ज्यांना समजायचंय ते समजतील", असं काजोलने म्हटलं.