अभिनेत्री नोरा फतेही हिचा सनबर्न फेस्टिव्हलला जाताना अंधेरी येथे रस्ते अपघात झाला असून ती जखमी आहे. याप्रकरणी मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर शिवडी येथे आयोजित सनबर्न फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली... सध्या नोरा हिच्या कारचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कारचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. अंबोली पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झाला होता.