अभिनेत्री स्वाती देवल यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या सोबत घडलेल्या संशयास्पद घटनेची माहिती दिली आहे. त्यांना बोरिवली पश्चिम येथील इंद्रप्रस्थ परिसरात एक अनोळखी महिलेने अडवून बायबल संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. स्वाती देवल यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्या, त्यानंतरही ती महिला त्यांच्या आजूबाजूला फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळानंतर त्याच ठिकाणी आणखी एक महिला आली आणि त्या दोघींमध्ये संशयास्पद चर्चा सुरू असल्याचे स्वाती देवल यांना दिसले. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आहे का? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.