मुक्ताईनगरात उद्या आदिशक्ती मुक्ताईचा आषाढी वारीचा परतीचा आगमन सोहळा पार पडणार आहे. त्यात सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून लाखो वारकरी संप्रदाय उपस्थित असणार आहेत. 30 जुलै रोजी मुक्ताईनगर इथल्या नवीन मुक्ताई मंदिर ते श्री क्षेत्र समाधीस्थळ कोथळीपर्यंत भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन केलं आहे.