आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांच्या गुरु शिक्षाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. विठ्ठल नामाच्या गजराने आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषाने मुक्ताईनगर दुमदुमले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही यात्रा उत्सव आहे. महाराष्ट्रभरातील वारकरी संप्रदाय मुक्ताईनगरमध्ये दर्शनासाठी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रभरातील उत्सवात शेकडोदिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असून लाखोच्याभरात भाविक या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेत आहे. राजकीय नेत्यांनीही हातात टाळ मृदंग घेतला आहे.