राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र प्रचार करणार आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रभागांपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आज किंवा उद्या प्रचार रणनीती निश्चित करतील, ज्यात बाईक रॅलीचाही समावेश असेल.