बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या बावनबीर गावातील नदीपात्रामध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणावर महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेद्वारे नदीपात्रातील अतिक्रमण हटवून नदीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्यात आला.