सिंधुदुर्गामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीय.कोकणातला बळीराजा सुखावलेला पाहायला मिळत आहे.गेले १५ दिवस पावसाने दडी मारलेली होती. त्यामुळं भात पेरणी केलेल्या बळीराजा संकटात सापडला होता. मात्र आता पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांना नवी सजीवनी मिळणार आहे. असंच पावसाचं सातत्य राहिलं तर कोकणातला बळीराजा हा शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असताना पाहायला मिळणार आहे.