नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदेच्या काठावरील ३३ गावांमधील २१ हजार लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळावी यासाठी सीएसआर फंडातून स्पीड बोट देण्यात आली होती. ही स्पीड बोट वापरण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे ही बोट आता परत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात येत आहे. बोट ॲम्बुलन्स नर्मदा नदीत बुडाल्यानंतर ही स्पीड बोर्ड परत देण्याच्या निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य आरोग्य विभागाने घेतला आहे.