चार दिवसानंतर कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवरची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू आहेत. पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची संख्या देखील कमी झाली आहे. टू व्हीलरसाठी 200 आणि फोर व्हीलरसाठी दोन हजार रुपयांची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं कोल्हापुरातील पेट्रोल पंप चालकांसह वाहनधारकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.