लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये सीलबंद खतांच्या पोत्यांमध्ये दगड,धोंडे,खडे आढळलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला पैसे देऊन दगड धोंडे विकत घेतल्याचा अनुभव येतो आहे.बियाणे बोगस निघाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यात बोगस खतांच्या तक्रारीची भर पडली आहे. बियाणे आणि खते बोगस निघत असल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. रेणापूर येथील शेतकरी महादेव वाघमारे यांच्या शेतावरील घटना आहे.