गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता आणि 42 अंशावर तापमान गेले होते.अशातच आज सायंकाळी गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार झालेल्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामातील धान पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.