तसेच नायलॉन मांजा विक्री केल्यास पोलीस व प्रशासनाकडून कठोर कारवाई होऊ शकते, याची माहिती देण्यात आली. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट, अमृत चौकासह विविध भागातील पतंग व दोरा विक्रेत्यांना गुलाब पुष्प देत नायलॉन मांजा विकू नये, अशी विनंती करण्यात आली. या उपक्रमाला सर्व विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.