अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 73 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून अवघ्या 73 जागांसाठी तब्बल 4 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पुढील चार दिवस उमेदवारांची शारीरिक चाचणी (फिजिकल टेस्ट) घेण्यात येणार आहे. साध्या वेशातील पथक भरती केंद्र परिसरात तसेच उमेदवारांच्या निवासस्थानी परिसरात तैनात करण्यात आले आहे, तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला देखील सतर्क करण्यात आले असून संशयास्पद उमेदवार आढळल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.