अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथून एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ अंगावर थरकाप उडवणारा. चारचाकी गाडीने एका दुचाकी स्वराला धडक मारून चारचाकी चालक न थांबता गाडी फरफटत नेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. एस टी बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.