अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर येथे अतिक्रमण हटवण्याची मोहीम अखेर सुरू झाली आहे. नगर-मनमाड महामार्गालगत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे साई भक्तांनाही नाहक त्रास करावा लागत होता. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करत अतिक्रमणधारकांना इशारा दिला होता. मात्र तरीही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवलं नाही. त्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. त्यानंतर पोलिसांच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे