भक्ष्याच्या शोधात फिरणारा एक बिबट्या रात्री पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर येथे घडली.सकाळी आजूबाजूच्या लोकांनी बिबट्याला टाकीत पडलेले पाहिल्यानंतर वनविभागाला कळवले. वनविभागाने नंतर नागरीकांच्या मदतीने पिंजरा टाकीत सोडून बिबट्याला वाचवले. या बिबट्याला वनविभागाकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.