एका खाजगी दवाखान्यात दिवसा ढवळ्या चोरट्याने रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक गावामध्ये घडली. डॉक्टर आणि नर्स ओपीडी संपवून दुपारी जेवणासाठी गेले असता चोरट्याने डाव साधत काऊंटरचा गल्ला तोडून आठ ते दहा हजारांची रोकड लंपास केली. चोरीची संपूर्ण ही घटना दवाखान्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे..