उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत इमामपूर घाटाचे ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले. यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकरी या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी घाटाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प आणि पैस खांबाची प्रतिकृती उभारण्यात आली असून ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. नव्या नामकरणामुळे या परिसराला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक बळकट झाली आहे.