कोपरगाव शहरात अचानक फायरिंगचा आवाज, हातात शस्त्र घेऊन धावणारे पोलीस… काय घडलंय असा प्रश्न नागरिकांना पडला? पण ही पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाची रंगीत तालीम होती. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून ही पूर्वतयारी करण्यात आली.