अहिल्यानगर - लोणी आणि परिसरातील सोनगाव, सात्रळ आणि धानोरे गावांमध्ये चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या चोरीमुळे ग्रामस्थ आता स्वतःच रात्री गस्त घालत असून, गाव सुरक्षा पथके आणि मोबाईल अलर्टच्या मदतीने चोरट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.