पावसाअभावी अहिल्यानगर जिल्ह्यातील खरीप उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून भंडारदरा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे. सुदैवाने भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने शेतीसाठी पाणी देणं शक्य होत आहे. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेल्या शेतीसाठी आणि शेकडो गावातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.यामुळे शेतकऱ्यांसह नागरीकांना दिलासा मिळाला आहे.