संगमनेर नगरपालिका हद्दीत असलेले सुकेवाडी रोड परिसरातील डॉ. अशोक इथापे यांच्या लेडीज हॉस्टेलच्या इमारतीचा काही भाग वादळी पावसात कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करत धोकादायक बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. या घटनेत शेजारील घरांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित बांधकाम निकृष्ट आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट करत कडक कायदेशीर कारवाईचे संकेत दिलेत