पावसाने पाठ फिरवल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील खरिप उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरलेले खरिपाची पिके जगवण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि मक्यासह शेतात उभी असलेली इतर पिके पावसाअभावी सुकून चालली आहेत. येत्या काही दिवसांत जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.