नागापूर येथील सोयाबीन पिकांची दयनीय अवस्था पाहता शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. शासनाने तातडीने पिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी किन्ही महादेव परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. पावसाअभावी हातचे पीक जाण्याची वेळ आल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे..