अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात बिबट्यांची दहशत कायम असून गेल्या पंधरा दिवसांत चौथा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. गीताराम ढोकचौळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज हा बिबट्या अडकल वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आह खंडाळा गावात बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांना शेतात जाणंही धोकादायक बनलं आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबटे पकडण्याची मोहीम सुरू केली असून, गेल्या पंधरा दिवसांत चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.