घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळ गेल्या 29 वर्षापासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखराची चढाई करत शिखरावर गुढी उभारत असतात.. आजही मोठ्या उत्साहाने सुर्योदयावेळी शिखरावर गुढी उभारत सर्वांना शुभेच्छा दिल्याय.. एक जानेवारीला देखील हे मित्र मंडळ अशाच प्रकारे शिखराची चढाई करत नववर्षाचे स्वागत करतात.. नवरात्र उत्सवात दररोज देवीचे दर्शन तसेच अनेकदा गड स्वच्छता अभियान राबविण्यात येते.