मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च आता संगमनेरहून लोणी या पालकमंत्री विखे पाटील यांच्या गावात धडकणार आहे.आंदोलक संगमनेरहून लोणीच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत.सरकारकडून कुठलाही निरोप न आल्याने लाँगमार्च लोणीच्या दिशेने निघाला आहे.आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा लाँगमार्च काढण्यात आला आहे.