अहमदाबादमध्ये अस्सल गुजराती चवीचा अनुभव घेण्यासाठी चंद्रविलास हेरिटेज रेस्टॉरंट एक महत्त्वाचे ठिकाण आहे. १२० वर्षांहून अधिक जुने असलेले हे रेस्टॉरंट आपल्या पारंपरिक गुजराती थाळीसाठी प्रसिद्ध आहे. केवळ ३५० रुपयांमध्ये २० प्रकारच्या डिशेस असलेली ही थाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनाही आवडली आहे, ज्यामुळे हे ठिकाण शहराचे फूड हेरिटेज स्पॉट बनले आहे.