पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील ग्रामस्थांनी अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोदडे यांचा मृत्यू होऊन आठवडा उलटला तरी वनविभागाने नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले नाही. पोलिसांच्या विरोधानंतरही संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र निदर्शने करत कारवाईची मागणी केली.