टेक उद्योगाप्रमाणे आता बँकिंग क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकरकपातीचा धोका वाढत आहे. एका अहवालानुसार, पुढील ५ वर्षांत युरोपमधील बँकांमध्ये २ लाखांहून अधिक नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात. एआय, डिजिटायझेशन आणि शाखा बंद होणे ही प्रमुख कारणे आहेत, ज्याचा परिणाम बँक ऑफिस आणि रिस्क मॅनेजमेंटमधील कर्मचाऱ्यांवर अधिक होईल.