नागपूरात होत असलेल्या आजच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामन्यासाठी नागपूर पोलिसांची कडेकोट सुरक्षा पहायला मिळत आहे. जामठा स्टेडियम परिसरात गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी देशात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. जामठा येथील व्हीसीए स्टेडियममध्ये आज 40 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. स्टेडियम परिसरात ‘AI निरीक्षक प्रोजेक्ट’ हे तंत्रज्ञान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी जोडलेले असून रिअल-टाइममध्ये गर्दीचे स्कॅनिंग सुरु आहे. पोलिसांच्या 'सिम्बा' (Simba) डेटाबेसच्या मदतीने गर्दीत लपलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यास मदत होत आहे. गर्दीत जर कोणाकडे चाकू, पिस्तूल किंवा संशयास्पद वस्तू असेल, तर AI सिस्टीम 1 सेकंदापेक्षा कमी वेळात पोलिसांना अलर्ट पाठवणार आहे.