अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात लवकरच विमानतळाचे काम सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, बीडची रेल्वे अहमदनगरपर्यंत पोहोचली असून, ती मुंबईपर्यंत नेण्याचा आणि इलेक्ट्रिकवर चालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमधील वाढवण बंदराला ७६ हजार कोटींची मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.