अजित पवार आज सकाळी बारामती हॉस्टेल येथे एका बैठकीसाठी पोहोचले. मात्र, हॉस्टेल बंद असल्याने त्यांना काही काळ बाहेर थांबावे लागले. यामुळे संतप्त झालेल्या अजित पवारांनी आपल्या PA ला बोलावून तात्काळ कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना बसण्याची सोय करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.