राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. यानंतर अजित पवारांच्या आजोळात म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात शोककळा पसरली आहे. देवळाली प्रवरा गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. याच देवळाली प्रवरा गावात अजित पवार यांचा जन्म झाला होता. तीन महिन्यापूर्वीच अजित पवार यांनी आजोळात दौरा केला होता. सगळ्या मामांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या होत्या. अजित पवारांचे मामेबंधू चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले.